कोरोना धमाका : लातूर जिल्यात 13 पॉझेटिव्ह, लातूर-05, उदगीर-05, लातूर ग्रामीण-03
* 13 जून 2020* 11.35 PM
*लातूर जिल्ह्यातील 112 व्यक्तीच्या स्वाबपैकी 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 91 अहवाल निगेटिव्ह*
*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 48, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 130 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8*
लातूर, दि. 13(जिमाका):- लातूर जिल्ह्यातून दिनांक 13 जून 2020 रोजी 112 व्यक्तीच्या स्वाबचे नमुने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी आलेले होते.
त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकुण 39 व्यक्तीच्या स्वबची तपासणी करण्यात आले असून 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून भुसार लाईन व शावली मोहल्ला लातूर 01, बाभळगाव व पाखरसांगवी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश bआहे. भुसार लाईन, सावली मोहल्ला व पाखर सांगवी येथील प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आज नव्याने आलेला आहे तर बाभळगाव येथील रुग्ण हा पूर्वीच्या संपर्कातील आहे.
उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून 33 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते त्यापैकी 5 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 4 व्यक्ती यापूर्वीच्या पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील आहेत तर एक व्यक्ती हनुमान नगर येथील नव्याने पॉझिटिव्ह आहे.
लातूर महापालिकेकडून 18 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते त्यापैकी 3 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल रिजेक्ट करण्यात आलेला आहे तीन पॉझिटिव्ह व्यक्ती खाडगाव रोड येथील पूर्वीच्या पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
लातूर स्त्री रुग्णालयातून 5 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी आले होते त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे पॉझिटिव्ह व्यक्ती ही बाभळगाव येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील आहे.
याप्रकारे लातूर जिल्ह्यातील आज 112 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आलेले होते त्यापैकी 91 अहवाल निगेटिव्ह आलेले असून 13 अहवाल पॉझिटिव्ह तर एक 1 रिपोर्ट रद्द केला असून इतर 7 अहवाल अनिर्णित आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
**********