उदगीरचा एक रुग्ण पॉझेटिव्ह तर 10 रुग्णांना सुट्टी मिळाली
उदगीरचा एक रुग्ण पॉझेटिव्ह तर 10 रुग्णांना सुट्टी मिळाली
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 08.06.2020 रोजी एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला असुन एका व्यक्तींचा स्वॅब परिपुर्ण न आल्यामुळे त्याचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पाझिटीव्ह आला आहे. कोविड केअर सेंटर, लातुर येथुन 02 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी एका व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला असुन एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे असे लातुर जिल्हयातील एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत, एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन एका व्यक्तीचा अहवाल रद्द करण्यात आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.