लातूर 10, उदगीर 03, अहमदपूर 02, एकूण 15 पॉझेटिव्ह
दिनांक 24.06.2020 08.00 PM
लातूर 128 पैकी 104 निगेटिव्ह 15 पॉझिटिव्ह 09 Inconclusive
आज 12 रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी*
आज उदगीर येथे एका 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पन्नास उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 185 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 68 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून , 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 04 व्यक्ती वाल्मिकी नगर लातूर येथील आहेत व माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे व सारोळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अहमदपूर येथिल 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या निवासी डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या स्वबची तपासणी केली असता त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही आनंदाची बाब आहे.