लातूर जिल्ह्यात 07 पॉझेटिव्ह, 03, उदगीर - एकुर्गा 01, औसा 01


 


लातूर 127 पैकी 112 निगेटिव्ह 07 पॉझिटिव्ह 08 Inconclusive


       दि.18 जून 2020



*लातूर जिल्ह्यातील 127 पैकी 112 निगेटिव्ह, 07 पॉझिटिव्ह व 08 अनिर्णित*


*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 67, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 139 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11*


*आज विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेतून दोन रुग्णांना प्रकृती बरी झाल्याने सुट्टी*


 


लातूर, दि.18(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत एकूण 127 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 112 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 08 व्यक्तींचे अहवाल अनिर्णीत आहेत.
      127 स्वाब पैकी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे  अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला  आहे.
   *पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती भोई गल्ली लातूर येथील असून एक व्यक्ती सुतमिल रोड लातूर येथील आहे व एक व्यक्ती माळकोंडजी ता. औसा येथील आहे. महानगरपालिकेकडून तापसणीसाठी आलेल्या स्वब पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ती व्यक्ती जुनी कापड लाईन लातूर येथील आहे. तसेच एक पॉझिटिव्ह व्यक्तीही निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील असून ही व्यक्ती परदेशातून आलेली आहे. एकुरगा तालुका जळकोट येथील एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असून त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे,* अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.
     दिनांक 03.05.2020 रोजी रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील एकाच कुटुंबातील 50 व 40 वर्ष  वयाचे दोन्ही रुग्ण  या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता व दोघेही 12 दिवस अतिदक्षता विभागात होते. त्या दोन्ही रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांची आज रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे अशी माहिती डॉ. गजानन हलकंचे,  कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैदकशास्त्र डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.
     जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 67, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 139 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 आहे.
           ********


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा