पुन्हा मुंबई कनेक्शन ; सेनगावचे 03 रुग्ण पॉझेटिव्ह

पुन्हा मुंबई कनेक्शन ; सेनगाव येथे क्वारंटाईन केलेल्या तिघांना कोरोनाची बाधा


रुग्ण संख्या पोहचली ४२ वर


हिंगोली - मुंबई येथून सेनगाव तालुक्यातील भगवती येथे परतलेल्या तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी (ता.१४) प्राप्त झाला असून रुग्ण संख्या ४२ वर गेली आहे. सततच्या रुग्ण वाढीने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.


दरम्यान, आजपर्यंत २२८ रुग्ण कोरोना  संक्रमित झाले आहेत. त्यापैकी १८६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला जिल्हा रुग्णालयासह केअर सेंटर मध्ये ४२ कोरोना बाधित रुग्णावर उपचार चालू आहेत. वसमत येथील केअर सेन्टर मध्ये एकूण दोन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये कुरेशी मोहल्ला एक, अशोक नगर एक अश्या दोघांचा यात समावेश आहे. यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसल्याचे सांगितले.


तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर पाच कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात जाम एक, दाती तीन, डोंगरकडा एक, यांचा समावेश आहे. तसेच येथील कोरोना केअर सेंटर मध्ये एका एसआरपीएफ जवानाला कोरोना ची लागण झाल्याने त्यास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.


जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्डात एकूण ३१ रुग्णावर उपचार सुरू आहेत यात चोंढी पाच, सेनगाव तीन, रिसाला बाजार दोन, नगर परिषद कॉलनी हिंगोली चार, कालगाव पाच, सिरसम बुद्रुक एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक, खानापूर एक, पेन्शनपुरा एक, भोईपुरा एक, कमलानगर एक ,सम्राट नगर वसमत एक अशा ३१ जनावर उपचार सुरु असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.


आतापर्यन्त जिल्ह्यात २८४७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे.त्यापैकी २३४७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यातील२३०७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.सद्य स्थितीला ५१४ रुग्णावर उपचार सुरु असून ११० रुग्णांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. यातील किती रुग्ण पॉझिटिव्ह  निघतील यावर सर्व काही अवलंबून आहे. त्यानंतरच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येचा आलेख वाढत जाणार की घसरणार यावर सर्व काही आहे. सध्या तरी सततच्या रुग्ण संख्येमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येचा आलेख वाढत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत सापडले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा