दिलासादायक : लातूर जिल्यात फक्त 01 पॉझिटीव्ह, औसा - येल्लारी येथील


लातुर 25 पैकी 24  निगेटीव्ह 01पॉझिटीव्ह              


*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33,


उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 111


व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4*           


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 07.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


सदर व्यक्ती औसा तालुक्यातील येल्लोरी येथील असून मुंबई येथून प्रवास करून आलेली आहे. त्यांना ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असून त्यांना  निमोनिया असल्याचे कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.


उपजिल्हा रुग्णालय, निलंगा 01,  औसा 08, कासारशिरसी 01 असे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह  आले  आहेत



असे लातुर जिल्हयातील एकुण 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी  24  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे  अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. 


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा