01 प्रलंबित अहवाल पॉझेटिव्ह - एकूण 11 अहवाल एकाच दिवसात पॉझेटिव्ह
दि. 17 जून 2020
01 प्रलंबित अहवाल पॉझेटिव्ह - एकूण 11 अहवाल एकाच दिवसात पॉझेटिव्ह
208 टोटल
65 active
discharge 133
death 10
*लातूर जिल्ह्यातील 93 पैकी 81 अहवाल निगेटिव्ह, 10 पॉझिटिव्ह तर 2 अनिर्णीत*
*कासारशिरशी ता. निलंगा येथील प्रलंबित एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह*
*आज लातूर 1 व औसा 2 असे एकूण तीन रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली*
लातूर, दि. 16(जिमाका):- जिल्ह्यातील आज दिनांक 16 जून 2020 रोजी 93 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आलेले होते. त्यापैकी 81 व्यक्तीच्या स्वाब चे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असून 10 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर *2 व्यक्तीचे आवाहल अनिर्णीत आहेत. तर दिनांक 15 जून 2020 रोजी चा कासारसिरसी ता निलंगा येथील प्रलंबित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. असे जिल्ह्यात आज एकूण 11 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत*.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे एकूण 20 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी होते त्यातील 18 व्यक्तीच्या अहवाल निगेटिव्ह असून दोन व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत त्यापैकी एक व्यक्ती जुनी कापड लाईन येथील आहे. तर दुसरी पॉझिटिव व्यक्ती औसा तालुका आंदोरा येथील आहे.
उदगीर उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत 22 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आले होते त्यातील 5 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत त्या पॉझिटिव व्यक्तींपैकी एक व्यक्ती नूर पटेल कॉलनी, एक व्यक्ती नोबल कॉलनी व 3 व्यक्ती या विकास नगर येथील पूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून 3 रुग्ण किंनी येल्लादेवी येथील आहेत.
दोन पॉझिटिव व्यक्ती या आंदोरा तालुका औसा येथील आहेत. एक व्यक्ती चांदोरी तालुका निलंगा येथील पूर्वीच्या पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील आहे तर *एक व्यक्ती कुणाली तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथील असून निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत आहे*.
दिनांक 15 जून 2020 रोजी च्या प्रलंबित असलेला कासारशिरशी तालुका निलंगा येथील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे या पद्धतीने लातूर जिल्ह्यात दिनांक 16 जून 2020 रोजीचे दहा अहवाल पॉझिटिव्ह तर 15 जून 2016 रोजी च्या प्रलंबित असलेला एक अहवाल पॉझिटिव्ह असे एकूण अकरा आवहल पॉझिटिव्ह आलेलले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली.
*तसेच आज मोती नगर लातूर येथील एक रुग्ण व कादरी नगर औसा येथील दोन रुग्ण उपचारांनी बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे, अशी माहिती डॉक्टर ढगे यांनी दिली. तसेच आज रोजी लातूर जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 133 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10 इतकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे*.
*********