आंबाळा शिवारात एकाची गळफास घेवून आत्महत्या
हिंगोली - वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या आंबाळा शिवारात एकाने कोरोनामुळे कामधंदा नसल्याने नैराशातून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या बाबत कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.20) आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या आंबाळा शिवारात साहेबराव मुंजाजी भाकरे (वय 50) राहणार चोंढी बहीरोबा ता. वसमत जि. हिंगाली या मजुराने मंगळवारी (ता.19) दुपारच्या वेळी लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने नैराश्यातून आंबाळा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या बाबत विजय साहेबराव भाकरे यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी तोंडी खबर दिल्यावरून आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत