हिंगोली : व्हीआरआरटी पथकासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा 

व्हीआरआरटी पथकासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा 


भानखेडातांडा येथील घटना


हिंगोली -  सेनगाव तालुक्‍यातील भानखेडातांडा येथे बाहेर गावावरून आलेल्यांना क्‍वारंटाईन का केले या कारणावरून व्हीआरआरटी पथका सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता. 28) गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली आहे. 


या बाबत माहिती अशी की, सेनगाव तालुक्‍यातील भानखेडातांडा येथे दिनकर पवार, बबन पवार यांना  क्‍वारंटाईन का केले म्‍हणून अंकूश पवार व विजय पवार यांनी व्हीआरआरटी पथकातील सदस्यांना आश्लील भाषा वापरल्यामुळे पथकाच्या अध्यक्षा तथा सरपंच ज्‍योती कोटकर यांनी दिलेल्या पत्रावरून हट्टा पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.


दरम्‍यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली उपविभागात मुंबई, पुणे अशा महानगरातून तसेच इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांनी क्‍वारंटाईन कक्षात किंवा कोरोना विषाणुच्या अनुषंगाने स्‍थापन करण्यात आलेल्या रुग्णालयात दाखल होवून उपविभागातील वाढती रुग्णसंख्या व इतर जिल्‍ह्‍यातून हिंगोली येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊनये म्‍हणून मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद तसेच इतर जिल्‍ह्‍यातील, राज्यातील कंटनमेंट झोन व रेड झोन मधुन हिंगोली जिल्‍ह्‍यात येणाऱ्या नागरिकांना बंधनकारकरित्या संस्‍थात्‍मक विलगीकरण व्हावे व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करून व्हीआरआरटी पथकास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा