रुग्णालयात दहशत घालणाऱ्या जवानांचा बंदोबस्त करा
रुग्णालयात दहशत घालणाऱ्या जवानांचा बंदोबस्त करा
जिल्हा शल्यचिकित्सकाची
एसआरपीएफ समदेशकाकडे तक्रार
हिंगोली - येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोनाबाधित जवान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत घालणाऱ्या त्या जवानांचा तात्काळ बंदोबस्त केल्यास उपचार करता येथील अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी लेखी पत्राद्वारे राज्य राखीव दलाच्या समदेशकाकडे तक्रार केली आहे. आता समदेशक गोंधळ घालणाऱ्या जवानांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य राखीव दलाच्या समदेशकाकडे केलेल्या तक्रार निवेदनात नमूद केले की,आपल्या अधिनस्त असलेल्या मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेल्या जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डात भरती केलेल्या जवानांवर उपचार सुरू आहेत. भरती केलेले जवान बेडवर न थांबता वॉर्डात व रुग्णालयाच्या गच्चीवर बिनधास्त पणे मुक्त संचार करीत असल्याचे व्हिडीओ क्लिप द्वारे निदर्शनास आले असल्याचे सांगून ती व्हायरल झाल्याने रुग्णालय परिसरातील वास्तव्यास असलेल्या कुटूंबियात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तसेच यापूर्वी देखील मंगळवारी (ता.५)जवानांचा असाच काहीसा प्रकार समोर आल्याने परिचारिका यांनी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. याशिवाय कामगार सेवकांनी, जवानांची समजूत घातली असता जवानांनी उद्धटपणे वागून तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला कोरोना झाला आहे. तुम्हाला पण संसर्ग केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे सांगून आम्ही असेच फिरणार असल्याची धमकी जवानांनी परिचारिका यांना दिल्यामुळे या जवानांवर उपचार कसे करावेत असा प्रश्न रुग्णालयातील डॉक्टर ,परिचारिका यांना पडला आहे.तसेच रुग्णालय कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने कामगार व कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ही बाब अतिशय गंभीर असून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे. कोरोना सारख्या अतिसंसर्गिक आजाराचे स्वरूप लक्षात घेता उपचार व प्रतिबंध करण्यासाठी देशाचे संरक्षण करणाऱ्या जवांनाकडून अशी अपेक्षा नव्हती. या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने या गोंधळ घालणाऱ्या जवानांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी राज्य राखीव
पोलीस बलाच्या समादेशकांकडे लेखी पत्राद्वारे गुरुवारी केली आहे. आता राज्य राखीव दलाचे समदेशक या दहशत घालणाऱ्या जवानांवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी देखील या प्रकाराची दखल घेत हा प्रकार खूप गंभीर असून त्यांनी समदेशक यांना चांगलेच धारेवर धरले असून त्यांची खरडपट्टी काढली. तातडीने या जवानांवर कारवाई करा अन्यथा असा प्रकार पुन्हा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी दिली.