लातूर : - दुकाने उघडण्यासाठीची नवीन नियमावली
जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्यासाठीची नवीन नियमावली 6 मे रोजी जाहीर केली
लातूर- लातूर जिल्ह्यातील आस्थापनांसाठीची नवीन नियमावली लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सोमवार दि . ४ मे २०२० पासून सर्व आस्थापना उघडण्याची परवानगी देण्यात आली होती . मात्र बहुतांश नागरीकांनी सोशल डिस्टन्सचे पालन न केल्यामुळे आणि बाजारपेठेतील अनावश्यक गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन लातूर जिल्हा प्रशासनाने आस्थापना उघडण्यासाठीची नवीन नियमावली जाहीर केली आहे .
सर्व दुकाने , आस्थापनांचे चालक , मालक आणि कामगारांनी मास्क अथवा रुमाल , स्कार्फचा वापर करणे बंधनकारक . तसेच आपल्या मोबाईलमध्ये आरोग्यसेतू एप डाऊनलोड करणे आवश्यक .