कर्तव्यात कसुर करणारा कंत्राटी वैद्यकिय अधिकारी सेवामुक्त
कर्तव्यात कसुर करणारा कंत्राटी वैद्यकिय अधिकारी सेवामुक्त
जिल्हा शल्यचिकित्सकानी काढले आदेश ,कामचुकार पणा भोवला
हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एनसीडी कार्यक्रमातंर्गत कंत्राटी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी शुक्रवारी (ता.15) दिलेल्या पत्राद्वारे कायमस्वरुपी सेवामुक्त केले आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी कार्यक्रमातंर्गत असलेले कंत्राटी वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय कदम यांना दिलेल्या नियुक्ती आदेशाच्या कराराप्रमाणे कार्यालयीन वेळेनुसार कार्यालयात हजर राहून दिलेल्या जबाबदारी प्रमाणे राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम, कर्करोग, मधुमेह, ऱ्हदयरोग व पक्षाघात प्रतिबंधक या कार्यक्रमातंर्गत कामकाज करणे आवश्यक होते. परंतू या कार्यालयाकडून वारंवार लेखी सुचना देऊनही ते विना परवानगी अनाधिकृत गैरहजर राहत असल्याने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (एनसीडी) वर परिणाम होत आहे.
त्यामुळे या आपल्या गैरहजेरी बाबत कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवामुक्ती संचिकेत कार्यवाहीस्तव मंजूरी दिली आहे. त्यानुसार आपणास कार्यालयाकडून कंत्राटी, वैद्यकिय अधिकारी पदावरून कायमस्वरुपी सेवामुक्त करण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिले आहे.