हिंगोलीत तब्बल ५१ दिवसांनी दारूची दुकाने उघडली

 


हिंगोलीत तब्बल ५१ दिवसांनी दारूची दुकाने उघडली


तळीरामांची  दारू नेण्यासाठी वाईन शॉपवर गर्दी ,परवाना धारकानाच प्राधान्य


हिंगोली- जिल्ह्यात तब्बल दीड  महिन्यानंतर गुरुवारी (ता.१४)दारू दुकान उघडल्याने तळीरामांनी दारू खरेदीसाठी शहरातील रामलीला मैदाना लगत असलेल्या वाईन शॉपवर एकच गर्दी केली होती. मात्र परवानाधारक असेल तरच  मद्य देणार असल्याचे विक्रेत्याने सांगितल्याने ज्यांच्याकडे परवाना नाही अश्या मद्यपीना आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ आली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर  हिंगोलीत तब्बल५१ दिवसानंतर पहिल्यांदाच मद्य विक्रीची दुकाने एक दिवसाआड उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी दुकाने उघडल्याने तळीरामानी दारू खरेदी करण्यासाठी सकाळच्या सुमारास गर्दी करीत असल्याचे फोटो व्हाट्सऍप वर व्हारल होताच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी दुकान मालकांना दूरध्वनी करून सांगताच दहा मिनिटे पुन्हा दुकान बंद केले होते. त्यानंतर काही दारुड्यानी परवाना धारकांनाच द्या असे म्हणत थोडा वेळ गोंधळ घातला होता. बंदोबस्तावरील पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणल्यानंतर पुन्हा दुकानाचे शटर वरून दारू विक्री केली जात होती. यावेळी संबंधित दुकान मालकाला देखील गर्दी पाहून संताप  आला होता.


शहरात दोन होलसेल वाईनशॉप असून केवळ एकच दुकान सुरु असल्याने या दुकानावर गर्दी झाली होती. तसेच इतर देशी दारू दुकानाकार देखील ग्राहकांनी पुन्हा दुकान उघडणार की नाही या आशेवर प्रत्येक जण महिन्याचा माल घेऊन जात होते. तर काहींनी दोनचार युनिट घेऊन जात होते. परंतु इतर राज्यात दारू दुकाने उघडताच लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयास मिळत होते. मात्र हिंगोली जिल्ह्यात लॉक डाऊनकाळात दीड महिन्यानंतर दारू दुकाने उघडताच फारस्या रांगा दिसून आल्या नाहीत. कारण लॉकडाऊन मध्ये देखील काहींनी देशी, विदेशी पेक्षा गावठी मोहाची दारू पिण्याला पसंती दिली होती. त्यामुळे हिंगोलीतील 
तळीरामांनी दारू पिणे सोडले की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.


तब्बल ५१  दिवसानंतर दुकान उघडणार असल्याने मद्य विक्रेत्यांनी शासनाने घालून दिलेल्या आदेशाचे पालन करत आज दुकाने उघडली आहेत. विशेष म्हणजे देशी पिणाऱ्याची सर्वाधिक जास्त संख्या असल्याने  विक्रेत्यांनी कालपासूनच आपल्या दुकानाबाहेर सर्व तयारी केलेली होती. एवढेच नव्हे तर मद्य प्रेमिंची संख्या वाढेल या आशेपोटी सर्व बारकाईने  नियोजन लावलेले आहे.एवढेच नव्हे तर शासनाने घालून दिलेल्या नियमचे पालन करत दुकानात काम करण्यासाठी निरोगी मजुराची देखील निवड केलेली आहे. त्यांच्या हातात हँड ग्लोज, मात्र बाहेर ग्राहकांची गर्दीच नसल्याने दारू विक्रेत्यांना हातावर हात ठेवत ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ या भयंकर स्थितीतही येऊन ठेपली आहे. दुकानाच्या बाहेर सहा फूट अंतराने ग्राहक उभे राहण्यासाठी चुन्याच्या साह्याने गोल रिंगण मारण्यात आलेले आहे. तसेच बॅरिकेटही बसविण्यात आले होते. ग्राहकांनी शकल लढवीत आपला चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मास्क तसेच मोठा रुमाल, गॉगल लावून रांगेत उभे होते. ज्यावेळेस रांगेतील फोटो काढले जात होते त्यावेळी काहींना तर असे वाटले की आपला चेहरा वर्तमान पत्रात येऊ नये याची चांगली खबरदारी घेत दुसऱ्यांना रांगेत उभे करीत होते.तर काहींनी चक्क तातडीने दारू खरेदी करून पळ काढत असल्याचे चित्र दिसून येत होते.


जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्या टप्यातील लॉकडाऊन(ता.१७) मेपर्यंत आहे. त्यामुळे केवळ एक दिवसाआड म्हणजेच गुरुवारी व शनिवारी दारू दुकानाला परवानगी दिली आहे.  त्यानंतर पुन्हा जिल्हा प्रशासनाकडून नवीन आदेश काढले जाणार आहेत. यात पुन्हा दारू दुकानाला परवानगी दयावी किंवा नाही ते आजच्या परिस्थिती वरून निर्णय घेतला जाईल. एकंदरीत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही अर्ध्यावर आल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा