बियर, वाईन पेक्षा तळीरामांचा देशी कडे कल 

बियर, वाईन पेक्षा तळीरामांचा देशी कडे कल 


दोन दिवसात तब्बल ३७ हजार बल्क लिटर दारूची विक्री


हिंगोली - जिल्हा प्रशासनाने दारू विक्रीसाठी परवानगी दिल्याने दोन दिवसात सुमारे ३७ हजार ३५७ बल्क लिटर मद्याची विक्री झाली असून तळी रामांचा कल हा देशी दारुकडे असल्याचा आकडेवारी वरून दिसून येते.


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरासह जिल्ह्यात २२ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आल्याने केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा गर्दी टाळण्यासाठी बंद केल्या होत्या.दोन मे ते सतरा मे या तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये शासनाने मद्य विक्री सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परिस्थिती पाहून गुरुवारी, व शुक्रवारी असे एक दिवसाआड दारू विक्रीस परवानगी दिली होती .त्यानुसार जिल्ह्यात ४१ देशी दारू दुकाने, तीन विदेशी तर ४२ बियर दुकानातून मद्याची विक्री झाली आहे.


देशी मद्य विक्री दुकानातून दोन दिवसात २७हजार ६९५ बल्क लिटर तर विदेशी मद्यविक्री दुकानातून १२२२ तर ८०७० बियरची विक्री झाली आहे.एकूण ३७ हजार २५७ बल्क लिटर दारूची विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी दिली. त्यामुळे हिंगोलीतील  तळी रामांचा ओढा हा आकडेवारी वरून देशी दारुकडे असल्याचे दिसून येते.


जिल्ह्यात गेली दीड महिन्यापासून लॉकडाऊन मुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मद्य विक्रीची दुकाने, बियर बार, खानावळी, धाबे बंद ठेवले असतानाही लॉकडाऊनच्या काळात चढ्या दराने दारूची विक्री करून शासनाचा महसूल बुडवीत अवेध दारू विक्री केल्या जात होती. तसेच गावठी दारूचे अड्डे ही फोफावत असल्याने  दारूचे भाव लॉकडाऊन काळात न परवडणारे असल्याने  गावठीकडे दारू ढोसण्याला मद्यप्रेमींनी पसंती दिली होती. जिल्हा प्रशासनाने एक दिवसाआड मध्य विक्रीला परवानगी दिली खरी, मात्र पहिल्याच ५१ दिवसानंतर दारू दुकाने उघडल्यानंतर  दारू दुकानावर गर्दी झाली होती. परंतु परवाना धारकानाच मद्य विक्री केल्याने परवाना नसलेल्या ग्राहकांची घोर निराशा झाली.तर दुसऱ्या दिवशी शनिवारी १०ते एक या वेळेत दारू दुकाने उघडली होती. परंतु मद्यप्रेमींनी दारू घेण्यासाठी एकच गर्दी करून गोंधळ केल्याने दुकान मालकाने तातडीने गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी दुकान बंद करून गेल्याने तळीरामांची निराशा झाली.तरी देखील दोन दिवसात  सर्वात जास्त म्हणजे नागरिकांचा कल हा देशी दारू कडे दिसून आला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा