हिंगोली, जिल्‍ह्‍यात शहरी, ग्रामीण भागातील काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत






जिल्‍ह्‍यात शहरी, ग्रामीण भागातील काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत

 

हिंगोली,  : जिल्ह्यातील काही भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्‍याचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी शहरी व ग्रामीण क्षेत्रातील काही भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला असल्याचे जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रविवारी सांगितले.

 

कंटेनमेंट झोन मध्ये हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर, जवळा पळशी रोडची डावी बाजू, बागवानपूरा-तलाब कट्टा मस्जीदच्या पाठीमागे आणि गुहा चौक-पेन्शनपूरा या भागाचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात हिंगोली तालूक्यातील बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलु, लिंबाळा, गंगानगर (कारवाडी ग्रामपंचायत क्षेत्र) आणि आनंदनगर (बळसोंड ग्रामपंचायत क्षेत्र) तर सेनगाव तालूक्यातील माझोड, बरडा, खुडज आणि सुरजखेडा हे गावे कंटेनमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द  साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे.


 

 



 



Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा