जादा फिस अकारणाऱ्या शाळांवर कारवाई जादा फिस अकारणाऱ्या शाळांवर कारवाई करणार - शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

जादा फिस अकारणाऱ्या शाळांवर कारवाई जादा फिस अकारणाऱ्या शाळांवर कारवाई करणार


शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड


हिंगोली - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन कारण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यातच पालकांची परिस्थिती बेताची झाली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात शाळांनी फिस वाढविल्यास कारवाई करण्याचा इशारा शनिवारी (ता.९) शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याच्या पालक मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे.


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ८८ वर गेली आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय उपाय योजना केल्या आहेत. याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या . यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा, जिल्हा शालीचकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार , उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे , अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे ,माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के आदींची उपस्थिती होती.


जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून ,रुग्ण संख्येतही वाढ होत आहे.दोन दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह जवानांनी दहशत निर्माण करून जेवण चांगले मिळत नसल्याची ओरड करीत कोरोना संसर्ग वाढविण्याची धमकी दिली होती. तसेच जिल्ह्यातील पाणी टंचाई, रोजगार हमीची कामे ,राशन घोटाळा आदी तक्रारी पालकमंत्री गायकवाड यांच्याकडे  केल्या होत्या .त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हिंगोली दौऱ्याचे नियोजन केले. आणि शनिवारी दिवसभर विविध ठिकाणी भेटी देऊन सर्व योजनेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना देऊन मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी  हमीची कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या.


 पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, दर वर्षी राज्यात १५ जूनला शाळा सुरु होतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या आजाराने डोके वर काढल्याने त्याचा संसर्ग पसरवू नये म्हणून सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. परंतु यंदा देखील शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र  कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.राज्यात मुंबई, पुणे ,सोलापूर, यासह मराठवाडा, विदर्भात कोरोना बाधित रुग्णाची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.त्यामुळे परिस्थिती पाहूनच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.दुसरीकडे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यास विद्यार्थ्यांकडुन संस्था चालक जादा फिस आकारत असतात असा मुद्दा उपस्थित केला असता, त्या म्हणाल्या,कोरोनामुळे सध्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता शाळांनी फिस वाढवू नये, एकदाच फिस न घेता तीन महिन्यात फिस घ्यावी, पालकांना सोयीस्कर वाटेल असे शाळांनी केले पाहिजे, जर का शाळाकडून जादा फिस  आकारण्यात आल्यास थेट कारवाई करणार असा इशारा शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी हिंगोली येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा