भांडण सोडविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यालाच मारहाण ; पुसेगाव येथील घटना
भांडण सोडविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यालाच मारहाण ; पुसेगाव येथील घटना
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने अर्जदार व गैरअर्जदार (आरोपी) यांचेत त्याच्या राहत्या घरासमोर सुरू असलेला वाद सोडसोडवी करीत असताना त्यांनाच मारहाण झाल्याची घटना रविवारी (ता.17) घडली असून याबाबत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरसी नामदेव पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या पुसेगाव येथे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रामराव पोटे हे रविवारी अर्ज चौकशी कामी आरोपी महेश धामणे यांचे घरी गेले असता अर्जदार व गैरअर्जदार (आरोपी) यांचेत त्यांच्या राहते घरासमोर वाद चालु असल्याने त्यांना थांबविण्यासाठी श्री. पोटे व साक्षीदार श्री. दराडे दोघेही वट्यावर जावून सोडवासोडव करीत असताना यातील महेश धामणे याने पोलीस गणवेशात असताना सुध्दा गणवेशाची शर्टची कॉलर धरून नाकाच्या वरच्या बाजुस बुक्का मारून तु आलास का तुला पण मी खतम करून टाकतो अशी धमकी दिली.
तसेच साक्षीदार श्री. दराडे यांनी आरोपीस धरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काठीने उजवे हातावर मारून उजव्या हाताची करंगळीचे हाड फॅक्चर करून गंभीर जखमी केले व अश्लील भाषेत शिवीगाळ करून शासकिय कामात अडथळा करून पोलिस स्टेशनच्या जीपचा मागील दरवाजाची काच फोडून अंदाजे तीन हजाराचे नुकसान केले. या बाबत सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक रामराव पोटे यांच्या फिर्यादीवरून महेश धामणे याच्या विरोधात नरसी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.