हिंगोलीत पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, रुग्ण संख्या गेली १५ वर

हिंगोलीत पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला,

रुग्ण संख्या गेली १५ वर

 

 


 

हिंगोली - मुंबई येथून वसमत मध्ये परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील  एका २३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असल्याने रुग्ण संख्या १५ वर गेली आहे.

 

दरम्यान ,जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे कनेन्टमेन्ट झोन येथे कामाला गेलेल्या मजुरांची संख्या वाढत आहे.वसमत येथे परतलेल्या आठ कामगारांना 

कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. परंतु बुधवारी हिंगोली येथे एकाला 

कोरोनाची बाधा झाली असून तो मजूर या कोरोना संक्रमित यांच्याशी संपर्क झाल्याने तो देखील पॉझिटिव्ह आढळून आल्याने अहवालावरून स्पस्ट झाले.

 

आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोना ने शंभरी पार केली असून, त्यापैकी ८५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजघडीला जिल्ह्यात रुग्ण संख्या  १५ वर गेली आहे.

 

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, पालिका प्रशाशन कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मागील महिन्यात ९१ वर गेलेला आकडा कमी करण्यात प्रयत्नाला यश आले आहे. मात्र मुंबई, पुणे येथे कामाला गेलेल्या मजुरांना लॉकडाऊन मुळे कामे बंद झाल्याने मजुरांना गावाकडे परतण्याची वेळ आली आहे. हे मजूर मुंबई, पुणे येथे कन्टेन्टमेन्ट झोन मधून आल्याने वसमत मध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. तरी देखील आरोग्य यंत्रणेकडून या रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु केले आहेत. मुंबईहुन हिंगोली येथे परतलेल्या २३ वर्षीय पुरुषाला याच मजुरांच्या संपर्कात आल्याने त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सामान्य रुग्णालयातील प्रशासनाने सांगितले.

त्यामुळे भिरडा गावातील अन्य लोकांशी या व्यक्तीचा संपर्क आला का याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत असून बुधवारी एसडीएम अतुल चोरमारे, पोलीस उपअधीक्षक वैन्जने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी भेट देऊन कन्टेन्टमेन्ट झोन शील बंद केला आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा