डॉक्टर आपल्या दारी उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद



भारतीय जैन संघट नाः पी.डी.महाविद्यालयाचा उपक्रम


परभणी, गावंडे,  जि. प्रतिनिधी



लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य विषयक समस्या सुटाव्यात या उदात्त हेतूने भारतीय जैन संघटना व पी.डी. जैन होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाने गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेल्या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
गुरूवारी(दि.30) पाचव्या दिवशी अंबीका नगर परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.परिसरातील 150 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मोफत औषधी देण्यात आली तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढऊन करोनाला प्रतीबंध करण्यासाठी अर्सेनीक अल्बम 30 ही होमिओपॅथीक औषधी मोफत देण्यात आली.याप्रसंगी भारतीय जैन संघटना विभागाचे झुंबरलाल मुथा,  नीरज पारेख, पवन झांझरी, मुकेश जैन, महाविद्यालयाचे सचिव अभयराज जैन, प्राचार्य डॉ.विजय दाभाडे उपस्थित होते.  ङॉ. सुहास विभुते, ङॉ. शाम देशमुख, डॉ.मंजूषा नरवाडकर, डॉ.सुधीर येरमल,  डॉ.सिद्धार्थ पैंठणे,डॉ.मनोज पोरवाल, डॉ.सतिश घुले, योग शिक्षक जिंतूरकर यांनी नागरिकांची तपासणी केली.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा