हिंगोली :- अवेध वाळूच्या चार ट्रॅक्टरसह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, लॉक डाऊन मधील वाळू माफियावर सर्वात मोठी कारवाई आठ जनावर गुन्हे दाखल


हिंगोली - लॉकडाऊन काळात ही चोरी छुप्या मार्गाने अवेध वाळूची तस्करी  दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत असल्याने गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत खानापूर परिसरात चार ट्रॅक्टर सह २२लाख ,९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जनावर कळमनुरी पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे वाळू माफियाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.


जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लॉक डाऊन, संचारबंदी कायदा लागू केला आहे. दरम्यान या काळातही छुप्या मार्गाने वाळू माफियाकडून वाळू विक्री होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अवेध वाळूची चोरटी विक्री करणाऱ्यांवर मोहीम  हाती घेण्यात आली असता या मोहिमे दरम्यान चार जनावर केसेस करून त्यांच्याकडून२२ लाख ९७ हजार, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


कळमनुरी हद्दीतील कळमनुरीते खानापूर रस्त्यावर तसेच शिवपार्वती धाबा ते लासीना पाटी या परिसरात अवेध गौण खनिज, वाळू विनापरवानगी चोरटी वाहतूक करताना आढळून आल्याने चालक दिगंबर गंगावणे , रेती व ट्रॅक्टर भारत नागरे हे दोघेही राहणार खेड, त्यानंतर चालक सुधीर इंगळे राहणार टाकळी, रेती व ट्रॅक्टर मालक आकाश कांदे( खेड) ,चालक बाळू उर्फ विश्वजित पाईकराव राहणार टाकळी, रेती व ट्रॅक्टर मालक महादेव कांदे, (खेड) ,चालक ज्ञानेश्वर गोरे( खेड),रेतीव ट्रॅक्टर मालक पंजाब गीते (खेड) ,हे चौघे जण आढळून आल्याने त्यांच्या ताब्यातील ३:५ ब्रास रेती ,किमंत१७,५०० व गुन्ह्यात वापरलेले चार ट्रॅक्टर चार ट्रॉलीसह२२ लाख,८०हजार असा एकूण२२ लाख९७ हजार ,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार ,पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे,पोटे, बालाजी बोके, सुदाम लेकुळे,शंकर जाधव,सुनील अंभोरे, राजू ठाकूर,विठ्ठल काळे यांच्या पथकाने केली आहे. लॉकडाऊन मधील ही सर्वात मोठी कारवाई केल्याने वाळू माफियाचे धाबे चांगलेच दणाणले असून अवेध रेती वाहतुकीवर रोख लागणार आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा