...साहेब, तुमच्या पाया पडतो परंतु एक वेळ सोडा मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांचा पोलिसांकडे टाहो

...साहेब, तुमच्या पाया पडतो परंतु एक वेळ सोडा


मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांचा पोलिसांकडे टाहो


हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरासह जिल्ह्यात लॉक डाऊन सुरु आहे. तरी देखील नागरिक मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण फिरत असताना सोमवारी( ता.११) पोलीस पथकाने कारवाई करून शहर पोलीस ठाण्यात आणले असता नागरिकांनी टाहो फोडत साहेब तुमच्या पाया पडतो परंतु एक वेळ माफ करा अशी विनवणी केली.


जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, महसूल, पालिका प्रशासन वेळोवेळी सांगत आहे, अत्यावश्यक काम असेल तर बाहेर पडा अन्यथा विनाकारण बाहेर पडू नये,घरी थांबा, प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगून देखील काही महाभाग सकाळी मॉर्निंग वॉक ,तर संध्याकाळी एव्हीनिंग वॉक चे कारण पुढे करीत घराबाहेर पडत आहेत. अनेक वेळा मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना दम देऊन दंड आकारून सोडून दिले तरी परत परत नागरिक पुन्हा त्याच चुका करून कोरोनाला आमंत्रित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.


यापूर्वी शहर पोलीस व पालिका कर्मचारी पथकाने अनेक विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली. उठाबशा काढायला लावल्या,दंड आकारला ,असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन देखील नागरिकांना शहाणपण का येत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोमवारी (ता.११) आदर्श कॉलेज क्रीडा मैदानावर सकाळी सहाच्या सुमारास अनेक नागरिक मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याला मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक शेख सय्यद, पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितीन केनेकर ,यांच्यासह पालिका कर्मचारी विनय साहू, दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने मैदानाकडे धाव घेतली असता त्या ठिकाणी २०ते २५ युवक, नागरिक फिरताना आढळून आले असता त्यांना पथकाने ताब्यात घेत लॉक डाऊन असताना तुम्ही विनाकारण का फिरता असा जाब विचारताच नागरिकांची भंबेरी उडाली. साहेब तुमच्या पाया पडतो पण आम्हाला एकदा माफ करा अशी विनवणी ते नागरिक करू लागले. त्यानंतर  शहरातील विविध ठिकाणी फिरणाऱ्या ३२ नागरिकांकडून सहा हजाराचा दंड आकारण्यात आला आणि त्यांना सोडून देण्यात आले.पुन्हा असे फिरताना दिसल्यास जेल मध्ये टाकू अशी तंबी दिली.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा