दिलासादायक ; कोरोना बाधित रुग्ण झाला निगेटिव्ह, रुग्ण संख्या १४ वर
हिंगोली जिल्ह्याची ग्रीन झोनकडे वाटचाल
हिंगोली - सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार करणाऱ्या एसआरपीएफ जवानांचा पॉझिटिव्ह अहवाल सोमवारी निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरु आहे. आता एकूण कोरोना बाधितांची संख्या १४ वर घसरली आहे.
मुंबई ,पुणे आदी हॉटस्पॉट ठिकाणाहून कोरोना भागातून मजूर रविवारी वसमत येथे आले असता त्यांचे थ्रोट स्वाब नमुने पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना सेंटर मध्ये उपचारसाठी भरती करण्यात आले असून, या रुग्णांची प्रकृती स्थिर असून आजघडीला कोणताही गंभीर आजार व लक्षणे दिसून आली नाहीत. तज्ञ डॉक्टरा मार्फत त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
सामान्य रुग्णालयात भरती केलेल्या एसआरपीएफ ९१ जवाना पैकी सहा कोरोना लागण झालेल्या जवानांना औरंगाबाद येथील धूत रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. एकूण९९ रुग्णापैकी ८५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे आता केवळ १४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
आतापर्यन्त एकूण १५२२ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १३३३ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १३७८ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला १३८ व्यक्ती रुग्णालयात भरती असून ५७ रुग्णाचे अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.