हिंगोली : कोरोना रुग्ण बाधितांची संख्या कॉन्स्टंट, १२७ रुग्णाचे अहवाल प्रलंबित


 

हिंगोली -  जिल्ह्यात कोरोना लागण झालेल्या ९९  रुग्णापैकी ८५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने आजघडीला १४ रुग्ण कोरोना बाधित असून मंगळवारी ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने कोरोना बाधितांची संख्या मात्र कॉन्स्टंट आहे.मात्र अद्याप ही १२७ रुग्णाचे अहवाल येणे बाकी आहे.

 

मुंबई ,पुणे  आदी हॉटस्पॉट  ठिकाणाहून कोरोना भागातून मजूर रविवारी वसमत येथे आले असता त्यांचे थ्रोट स्वाब नमुने पॉझिटिव्ह  आल्याने त्यांना कोरोना सेंटर मध्ये उपचारसाठी भरती करण्यात आले असून, या  आठ रुग्णांची प्रकृती स्थिर असून आजघडीला कोणताही गंभीर आजार व लक्षणे दिसून आली नाहीत. तज्ञ डॉक्टरा मार्फत त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉ.श्रीवास यांनी सांगितले.एकूण सहा एसआरपीएफ जवान यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

 आतापर्यन्त एकूण  १६१७ व्यक्तींना जिल्ह्यातील कोरोना सेंटर मध्ये भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १३७८ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १४०४ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला २०७ व्यक्ती रुग्णालयात भरती असून १२७ रुग्णाचे अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा