हिंगोली, क्वारंटाइन सेंटर मधून २५ लोकांना डिसचार्ज
क्वारंटाइन सेंटर मधून २५ लोकांना डिसचार्ज
हिंगोली - बाहेर जिल्ह्यातून हिंगोली येथे दाखल झालेल्या २५ नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन केले होते. बुधवारी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्या २५ लोकांना घरी पाठवण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन, संचार बंदी लागू असताना तसेच जिल्हा बंदी असताना देखील काही नागरिक सर्व वाहने बंद असताना पायी प्रवास करून हिंगोली जवळ केली असता याबाबतची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार या नागरिकांना आरोग्य विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन लिंबाळा येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये १४ दिवस ठेवून त्यांच्यावर देखरेख करण्यात आली. त्यांचे स्वाब नमुने देखील निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बुधवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ. विठ्ठल करपे, डॉ. पटेल यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी क्वारंटाइन केलेल्या लोकांची पुन्हा डॉ. पटेल यांनी तपासणी केली असता कोरोनासी साम्य असलेली लक्षणे आढळून न आल्याने त्यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरोग्य विभागाने या संशयित
क्वारंटाईन केलेल्या लोकांची खात्री करूनच घरी पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी सांगितले.