हिंगोलीत भाजपाचे महाराष्ट्र बचाव आंदोलन
कार्यकत्यांनी काळ्या फिती लावून घरोसमोर केले आंदोलन
हिंगोली - येथे भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवार (ता.22) महाराष्ट्र राज्य कोरोना रुग्ण संख्येत नंबर एकवर आले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन कार्यकर्त्यानी आपल्या घरोसमोर केले.
कोरोना साथीच्या काळात महाराष्ट्र शासन सपशेल अपयशी ठरले आहे .मजूर उपाशी मरत आहेत .शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केल्या जात नाही रुग्णांना रुग्णसेवा मिळत नाही, पोलीस कर्मचारी साथीच्या रोगात बळी पडत आहेत मजुरांना कामे नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे देशात महाराष्ट्र राज्य कोरोना रुग्ण संख्येत नंबर एक वर आले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.
सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर पुढे राहून काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर ,संघटन सरचिटणीस फुलाजीराव शिंदे, अॅड. के. के. शिंदे ,कैलासशेठ काबरा, सुनिल जामकर,हमीद भाई प्यारेवाले, रजनीश पुरोहित, मोतीराम इंगोले ,नंदकुमार नायक आदीची उपस्थिती होती.