हिंगोलीत एसआरपीएफच्या दोन जवानाना सुट्टी
हिंगोलीत एसआरपीएफच्या दोन जवानाना सुट्टी
आता ४३ रुग्णावर उपचार
हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णायातील आयसोलेशन वार्डातून दोन एसआरपीएफ जवांनाना गुरूवारी (ता.14) सुट्टी देण्यात आली आहे. यात हिंगोली येथील एक जवान व जालना येथील एका जवानाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्राद श्रीवास यांनी दिली.
आजपर्यत जिल्ह्यात कोविड-19 चे 91 रुग्ण होते यापैकी 48 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. व सध्या 43 रुग्ण पॉझीटीव्ह आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डातून दोन एसआरपीएफ जवानाना सुट्टी देण्यात आली आहे. यात एक जवान एसआरपीएफ हिंगोली व एक जवान जालना एसआरपीएफचा आहे.
आता एकूण 42 बाधीत एसआरपीएफ जवान हे उपचारसाठी हिंगोली येथे भरती झालेले आहेत. उर्वरित एक रुग्ण जिल्हा रुग्णालयातील परिचारीका आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात जे रुग्ण भरती आहेत त्यांची प्रकृती स्थीर असून सद्यस्थितीत कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. उर्वरित नऊ एसआरपीएफ जवान औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटल येथे भरती आहेत.
आतापर्यत आयसोलेशन वार्ड व जिल्ह्यात सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 1418 व्यक्तीला भरती करण्यात आले होते. त्यापैकी 1307 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 1280 व्यक्तींना डिस्चार्ज दिला असून सद्या 129 व्यक्ती भरती आहेत. तर 21 जणांचे अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.