कळमनुरी तालुक्यात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले, गाफील राहिलेल्या तालुक्यात कोरोनाने काढले डोके







 


 

कळमनुरी तालुक्यात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले

 

गाफील राहिलेल्या तालुक्यात कोरोनाने काढले डोके 

 

हिंगोली - मुंबई, रायगड, पुणे येथून गावी परतलेल्या आठ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल रविवारी उशिराने प्राप्त झाला आहे. यामुळे गाफील राहिलेल्या कळमनुरी तालुक्यात आता कोरोना रुग्णांनी डोके वर काढले आहे. त्यांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ६९ वर पोहचली आहे.

 

दरम्यान, मुंबई चार, रायगड तीन , पुणे एक असे मिळून आठ व्यक्तीं कन्टेन्ट झोन मधून आपल्या मूळ गावी परतल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे. आतापर्यन्त हिंगोली, सेनगाव, वसमत ,औंढा, या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. मात्र एकमेव कळमनुरी तालुक्यात कोरोना चा अद्याप ही शिरकाव झाला नव्हता. कोरोनाचा शिरकाव होणार नसल्याचे पाहून आम्ही अलर्ट असल्याचे भासवून गाफील राहिलेल्या प्रशासनाला अखेर कोरोना रुग्णांचा सामना करावा लागत आहे. या बाहेर जिल्ह्यातून परतलेल्या मजुरांना कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू केले आहेत. आता जिल्ह्यात१६९ रुग्ण झाले असून त्यापैकी९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला ६९ रुग्ण संख्या झाली आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तरच रुग्ण संख्या कमी होईल, अन्यथा पुन्हा वाढण्याची दाट श्यक्यता आहे.


 

 



 



 















ReplyForward







Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा