हिंगोली : एसआरपीएफच्या ३ योध्याची कोरोनावर मात, ग्रीन झोन कडे वाटचाल
एसआरपीएफच्या ३ योध्याची कोरोनावर मात
कोरोना बाधितांचा आलेख घसरल्याने ,जिल्हा ग्रीन झोनकडे
हिंगोली - औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल मध्ये कोरोना पॉझिटिव्ह जवानांना भरती करण्यात आलेल्या सात पैकी तीन रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ सात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या९१ वर गेल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अक्षरशा कोमात गेली होती. आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाला धारेवर धरले होते. कोरोना योध्याना जेवण चांगले मिळत नव्हते याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर जेवणात सुधारणा झाल्यामुळेच कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत घट होत चालली आहे. जिल्हा रुग्णालयात ९१ रुग्णापैकी ८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आजघडीला केवळ सात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. आता जिल्हा पुन्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करीत आहे. सात जवानांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत. तसेच सहा जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याने सहा रुग्णांना औरंगाबाद येथे भरती केले आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ९१ गेल्याने हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात रेड झोन मध्ये गेल्याची नोंद झाली होती. यातील ८१ रुग्ण ठणठणीत झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.आजघडीला केवळ सात रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.त्यामुळे जिल्ह्याचा वाढलेला आलेख आता घसरत चालल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे.
जिल्ह्यातील कोरोना सेन्टर येथे १४३६ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १३१९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १३१९ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला १११ रुग्ण भरती असून ३३ रुग्णाचे अहवाल प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते.