हिंगोली - भिरडा, कालगाव, पारडा ,माळहिवरा कन्टेन्टमेन्ट झोन तर बासंबा बफर झोन घोषित


भिरडा, कालगाव, पारडा ,माळहिवरा कन्टेन्टमेन्ट झोन तर बासंबा बफर झोन घोषित

 

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आदेश

 

हिंगोली - तालुक्यातील भिरडा गावात कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण आढळून आला असल्याने या विषाणूचा इतरत्र फैलाव होऊ नये म्हणून भिरडा सह, कालगाव, पारडा ,माळहिवरा या गावाना कन्टेन्ट मेन्ट झोन घोषित केला असून तर बासंबा या गावाला बफर झोन घोषित केल्याचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले असून गाव देखील शील केले आहे.

 

मुंबई वरून परतलेला व वसमत येथील कोरोना पॉझिटिव्ह संपर्कातील एका २३ वर्षीय व्यक्तीला भिरडा येथे कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्याने हा आजार पसरवू नये याची दक्षता घेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भिरडा, कलगाव ,पारडा, माळहिवरा या चार गावाची हद्द सील केले तर बासंबा या गावाला बफर झोन मध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

दरम्यान ,या कन्टेन्टमेन्ट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर करडी नजर ठेवली जाणार असून ,कार्यालया मार्फत देण्यात आलेल्या आदेशानुसार या भागातील आवश्यक त्या सेवा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. केवळ ग्रामपंचायत मार्फत आवश्यकतेनुसार सेवा सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध साथ रोग कायदयानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान भिरडा येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने एसडीएम अतुल चोरमारे , डीवायएसपी रामेश्वर वैन्जने ,जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या पथकाने भिरडा व इतर गावाना जाऊन भेटी दिल्या आणि गावातील सर्व रस्ते सीलबंद केले तर संपूर्ण कन्टेन्ट मेन्ट झोन पॅक केला आहे

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा