हिंगोलीकराना दिलासा ; पुन्हा १८ एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त
हिंगोलीकराना दिलासा ; पुन्हा १८ एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त
जिल्ह्याची ग्रीन झोनकडे वाटचाल
हिंगोली - मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तवरून परतलेल्या ९१ कोरोना बाधित रुग्णापैकी मंगळवारी (ता.१२)जवान कोरोनामुक्त झाल्याने आता सुमारे ३८ रुग्ण बरे होऊन सुट्टी मिळाल्याने जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या आकडेवारीत पॉझिटिव्ह चे निगेटिव्ह मध्ये रूपांतर होत असल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली होती.कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करते की काय अशी भीती आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला लागली होती .मात्र जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी वेळीच तातडीने आरोग्य यंत्रणेच्या बैठका घेत त्यांचा चांगला समाचार घेत रुग्णाकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील उपचार घेत असलेल्या १८जवानांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने १८ जवानांना सुट्टी देण्यात आली. असून आता पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५३ असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता रुग्णालयात भरती असलेल्या ५१
एसआरपीएफ जवान पैकी ५०जवान हिंगोली तर एक जवान जालना येथील असून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने रुग्णालयात भरती केले आहे. यातील उर्वरित दोन रुग्णापैकी एक रुग्ण सेनगाव यासह परीचारिकेच्या यात समावेश आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोणतेही गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. यातील नऊ एसआरपीएफ जवानांची तब्येत खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डात व जिल्ह्यातील क्वारंटाइन सेंटर मध्ये एकूण १३७५ व्यक्तींना भरती केले आहे. त्यापैकी १३०३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.१२४८ व्यक्तींना सुट्टी दिली असून सद्यस्थितीत ११०रुग्णांना भरती केले आहे. आणखी पाच रुग्णांचे अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या प्रयत्नामुळे कोरोना पॉझिटिव्ह संख्येत घट होऊन निगेटिव्ह संख्या होण्याचे प्रमाण गेली दोन दिवसांपासून वाढल्याने आता दोन दिवसात सुमारे ३८ रुग्ण निगेटिव्ह झाल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्त होत असून ग्रीन झोनकडे वाटचाल करीत असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे.