कोरोना संशयितांचे २७२ अहवाल प्रलंबीतच !

 

 

कोरोना संशयितांचे २७२ अहवाल प्रलंबीतच !

 

हिंगोली - जिल्ह्यात कोरोना लागण झालेल्या व्यक्तींची संख्या निम्न स्तरावर घसरली असली तरी आतापर्यंत दोन हजार लोकांना भरती करण्यात आले होते यातील काहींना सुट्टी देण्यात आली तर काहींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजघडीला  ३२५ रुणांपैकी २७२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याने हा अहवाल पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह  येणार याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेले १०१ रुग्ण आढळून आल्याने रेड झोनकडे हिंगोलीने आगेकूच केली होती. मात्र यातील ८९ रुग्ण ठणठणीत होऊन बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्या १२ पॉझिटिव्ह रुग्ण संख्या असून त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु आहेत. त्यामुळे शुक्रवारी ना निगिटिव्ह ना पॉझिटिव्ह अशी स्थिती होती.

 

औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे भरती करण्यात आलेल्या सहा 

कोरोनाची बाधा असलेल्या जवानांना भरती केले होते. मात्र गुरुवारी यातील चार एसआरपीएफ पॉझिटिव्ह जवानांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याने आता केवळ दोन जवानांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

 

तसेच वसमत येथे मुंबई येथूनकन्टेन्ट मेन्ट झोन मधून आलेल्या आठ मजुरांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरु असून त्यांच्यावर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत उपचार सुरु आहेत. मात्र सद्य स्थितीत कोणतेही लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात कोरोनाची लागण  झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यन्त १८०५ कोरोना संशयित व्यक्तींना आयसोलेशन व कोरोना सेंटर मध्ये भरती करण्यात आले होते. त्यापैकी १४९४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून १४७८ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. तर आजघडीला ३२५ व्यक्ती ठिकठिकाणी भरती असून, यापैकी २७२ संशयितांचे अहवाल अनेक दिवसांपासून प्रयोग शाळेकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे या २७२ प्रलंबित अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह येणार याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान , शुक्रवारी अहवाल प्राप्त होताच  कोरोना रुग्णाची संख्या स्थिर असून  कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा मोकळा श्वास सोडला आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा