धक्कादायक, हिंगोली रुग्ण संख्या पोहचली ७३ वर

औंढा येथील एका क्वारंटाइन सेंटर मधील २५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण तर  ,तिघांना सुट्टी 



हिंगोली -  वसमत तालुक्यातील वापटी गावातील तिघांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असून मुंबई येथून औंढा तालुक्यात क्वारंटाइन सेंटर मधील दाखल झालेल्या एका २५ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता७३ वर गेली आहे.


जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्डात कोरोना लागण झालेल्या  ७३ रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी ८,सेनगाव १२, हिंगोली २९, वसमत१२, या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत.


जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसो लेशन वॉर्डात १२ ,औंढा पाच, भिरडा एक,सुरज खेडा एक,समुदाय आरोग्य अधिकारी दोन, पहेनी एक,माझोड एक,या गावातील रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२४८ रुग्णांना भरती करण्यात आले असून, त्यापैकी १८३० रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.१७५९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून, आजघडीला ४८१ रुग्ण भरती आहेत. तर ३२३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.


आजपर्यंत १७२ रुग्णापैकी ९९ रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. आजघडीला ७३ रुग्णावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील सेनगाव ,वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यांतर्गत क्वारंटाईन सेंटर मध्ये भरती केलेल्या २४४ रुग्णांचे थ्रोट स्वाब नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १९५ अहवाल निगेटिव्ह असून ,४९ अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ .श्रीवास यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा