पुन्हा मुंबई कनेक्शन ;हिंगोलीत आणखी चौघे जण पॉझिटिव्ह
रुग्ण संख्या पोहचली ७४ वर
हिंगोली - मुंबई वरून हिंगोली तालुक्यात परतलेल्या एका ११ वर्षीय बालकासह वसमत तालुक्यातील हट्टा येथील क्वारंटाइन सेंटर मध्ये भरती केलेल्या २९ वर्षीय पुरुषासह औंढा येथील कोरोना सेंटर येथील दोघांना
कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी रात्री प्राप्त अहवालावरून समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर गेली आहे.
दरम्यान ,पालिकेच्या स्वछता कर्मचाऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याचे स्वाब नमुनेनांदेड येथील प्रयोग शाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल आज निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.त्यामुळे पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे.
सद्यस्थितीला जिल्ह्यात कळमनुरी ८,सेनगाव १२,हिंगोली २९,वसमत १४ ,तर औंढा याठिकाणी कोरोना केअर सेंटर येथे कोरोना लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कुठलेही गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते. तसेच एका एसआरपीएफ जवानांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.
याशिवाय हिंगोली येथील
आयसोलेशन वॉर्डात ८ रुग्ण ,औंढा येथे एक, भिरडाएक, सुरजखेडा एक,समुदाय आरोग्य अधिकारी दोन,पहेनी एक, माझोड एक,अश्या१४ कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर येथे भरती करण्यात आले असून,त्यांच्यावर वैद्यकीय पथकामार्फत उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २०७४ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १६६८ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.१५६९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजघडीला ४९९ रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर १५९ रुग्णांचे अहवाल अद्याप ही प्रलंबित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी सांगितले.