हिंगोलीने कोरोना बाधितांनी केला हाफ सेंच्युरीचा आकडा पार
हिंगोलीत आणखी नवे ५ जवान पॉझिटिव्ह
कोरोना बाधितांनी केला हाफ सेंच्युरीचा आकडा पार
हिंगोली - मालेगाव,मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेल्या १९४जवानांना कोरंटाइन करण्यात आले. यापैकी शनिवारी आणखी पाच जवान पॉझिटिव्ह असल्याचे अहवालावरून समोर आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येने हाफ सेंच्युरीचा आकडा पार केला आहे.
क्वारंटाइन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या 53 जवानाना कोविड ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.यातील एक रुग्ण बरा होऊन निगेटिव्ह आल्याने त्यास सुट्टी देण्यात आली असून शनिवारी संध्याकाळी आणखी नवे सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात क्वारंटाइन करण्यात आलेल्या एकूण एसआरपीएफच्या ४७ जवाना पैकी यातील ४६ राज्य राखीव व एक जालना या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.४७पैकी ३४मालेगाव येथे कार्यरत होते तर १३ जवान मुंबई येथे कार्यरत होते. यापैकी ४७ कोरोना बाधित जवानांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
यापैकी चार जवानांना कोमारबीड कांडीशन ,उच्य रक्तदाब, मधुमेह असल्याने या चौघांना औरंगाबाद येथे भरती करण्यात आले .
सेनगाव येथील क्वारंटाइन सेंटर येथे शनिवारी भरती असलेल्या ४८ वर्षीय पुरुष कोरोना संक्रमण संपर्कातील असल्याने त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले. त्याची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील पाच ही तालुक्यातील क्वारंटाईन सेंटर येथे संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत.
कोरोना बाधितांचा हाफ सेंच्युरीचा आकडा पार
---------------------------
जिल्ह्यात शुक्रवार पर्यंत ४७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होत असून शनिवारी पुन्हा पाच नव्या रुग्णांची भर पडल्याने आतापार्यंत ५२ आकडा पार केला आहे.