पुन्हा मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी एक महिला पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या ७० वर
पुन्हा मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी एक महिला पॉझिटिव्ह
रुग्ण संख्या पोहचली ७० वर
हिंगोली - मुंबई येथून गावी परतलेल्या ३० वर्षीय एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, या महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. आता पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ७० वर पोहचली आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे एकूण १६० रुग्ण झाले आहेत त्यापैकी ९० रुग्ण ठणठणीत होऊन बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली .त्यामुळे आजघडीला ७० पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू केले आहे. तर कळमनुरी येथे कोरोना सेंटर मध्ये आठ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल मध्ये दोन जवान उपचार घेत होते. यापैकी एका जवानाचा पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह आल्याने सुट्टी देण्यात आली असून दुसरा जवान उपचार घेत आहे. यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह झालेले सर्वच जवान निगेटिव्ह आल्याने राज्य राखीव दलाच्या अधिकारी यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे.
याशिवाय सेनगाव येथील कोरोना सेंटर येथे१२ रुग्णावर उपचार सुरू आहे.तर हिंगोली शहरातील कोरोना सेंटर येथे ३० जनावर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून कुठलेही गंभीर लक्षणे दिसून येत नसल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.तसेच वसमत येथे १३ ,कळमनुरी येथे आठ रुग्णावर उपचार सुरु आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्ड येथे सहा रुग्ण असून यात औंढा एक, भिरडा एक, सुरजखेडा एक, समुदाय आरोग्य अधिकारी एक, यांचा समावेश असून सद्यस्थितीला रुग्णालयात भरती असून उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण१९५३ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १६४९ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १५४७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून घरी पाठविण्यात आले आहे. आजघडीला ४०१ रुग्ण भरती असून २१० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
दरम्यान, मुंबई चार, रायगड तीन , पुणे एक असे मिळून आठ व्यक्तीं कन्टेन्ट झोन मधून आपल्या मूळ गावी परतल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे. आतापर्यन्त हिंगोली, सेनगाव, वसमत ,औंढा, या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. मात्र एकमेव कळमनुरी तालुक्यात कोरोना चा अद्याप ही शिरकाव झाला नव्हता. कोरोनाचा शिरकाव होणार नसल्याचे पाहून आम्ही अलर्ट असल्याचे भासवून गाफील राहिलेल्या प्रशासनाला अखेर कोरोना रुग्णांचा सामना करावा लागत आहे. या बाहेर जिल्ह्यातून परतलेल्या मजुरांना कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू केले आहेत. आता जिल्ह्यात१६९ रुग्ण झाले असून त्यापैकी९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला ६९ रुग्ण संख्या झाली आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तरच रुग्ण संख्या कमी होईल, अन्यथा पुन्हा वाढण्याची दाट श्यक्यता आहे