गुरूवारी सायंकाळीपर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या शून्य


परभणी, गावंडे


प्रतिनिधी



जिल्ह्यात कोरोना विषाणु संदर्भात 803 संशयितांची नोंद झाली. 764 पैकी 674 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.दरम्यान,  जिल्ह्यात गुरूवारी(दि.30) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.
गुरूवारी नव्याने 71 संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. अधीचे 732 असे एकूण 764 पर्यंत संशयितांची नोंद झाली असून विलगिकरण कक्षात 249, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात  71 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले  483 जण आहेत.  62 जण परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेले 6 जण आहेत. आजपर्यंत प्रलंबीत स्वॅबची संख्या 71 असून तपासणीसाठी आवश्यक नसल्याचे 18 स्वॅब असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
सेलूच्या परिस्थितीवर नियंत्रण
सेलूतील राजमोहल्लातील रहिवाशी 55 वर्षीय महिला दुर्धर आजाराने काही महिन्यांपासून औरंगाबादला उपचारार्थ होती. 27 एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजता खासगी वाहनाद्वारे ती महिला सेलूत परत आली. व 28 एप्रिल रोजी परभणीत एका खासगी रुग्णालयात उपचार घेवून नांदेडला रवाना झाली. त्या ठिकाणी उपचारा दरम्यान ती कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्याची माहिती या दोघा अधिका-यांनी दिली. सेलुतील 27 व परभणीतील 24 अशा एकूण 51 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्या सा-यांना सेलू व परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती या दोघां अधिका-यांनी दिली. स्थितीवर नियंत्रण ठेवून  आहोत, असे या दोघां अधिका-यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांना आढावा बैठकी दरम्यान सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा