हिंगोलीत कोरोना बाधितांचे अर्धशतक पार
हिंगोलीत कोरोना बाधितांचे अर्धशतक पार
औरंगाबाद येथील एसआरपीएफ रुग्ण निगेटिव्ह ,रुग्ण संख्या
पोहचली ६१ वर
हिंगोली - जिल्ह्यात आतापर्यंत १५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील ९० रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे कोरोना बाधितांनी अर्धशतकाचा आकडा पार केला असून रुग्ण संख्या ६१ वर पोहचली आहे.
दरम्यान, औरंगाबाद येथे भरती करण्यात आलेल्या एका
एसआरपीएफ जवानाचा पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. यातील एक जवान भरती असून त्याला कुठल्याही प्रकारचे गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते.
सेनगाव येथील कोरोना सेंटर मध्ये कोरोना लागण झालेल्या १२ रुग्णावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच शहरातील लिंबाळा येथील कोरोना सेंटर येथे३१ रुग्णावर उपचार सुरु आहेत. याशिवाय वसमत येथील कोरोना सेंटर येथे १३ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात चार रुग्ण असून यामध्ये औंढा दोन, भिरडा एक, सुरज खेडा एक, यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आयसोलेशन वॉर्ड व कोरोना केअर सेंटर येथे १८७२ व्यक्तींना भरती करण्यात आले त्यापैकी १६०१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापैकी १५३५ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ३३३ रुग्ण भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर १८३ जणांचे अहवाल अद्याप ही येणे बाकी असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
![]() | ReplyForward |