राज्यातील मजूर  त्यांचे सध्याचे राहते ठिकाण, त्यांचे राज्य नाव व संख्या कळवावे

  राज्यातील मजूर  त्यांचे सध्याचे राहते ठिकाण, त्यांचे राज्य नाव व संख्या कळवावे तहसीलदार व्यंकटेश मुंडे

            परराज्यातील मजूरांची प्रवास मोफत प्रवास*       उदगीर(संगम पटवारी)संपूर्ण देशात कोरोना महामारी लागण झाली आहे त्याला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे वाहतूक बंद आहे. परगावी व परजिल्हयात विविध कामासाठी असलेले तसेच शिक्षणासाठी विद्यार्थी हे आपल्या गावी परत जाऊ शकत नव्हते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने याची खबदारी घेतली                   सर्व  स्वयंसेवी संस्था यांना कळविण्यात आले  महाराष्ट्र शासनाच्या नवीन  परिपत्रकाप्रमाणे परराज्यातील म्हणजेच (उत्तरप्रदेश छत्तीसगड मध्यप्रदेश बिहार कर्नाटक तेलंगणा आधी राज्यातील) मजूर जर आपल्या परिसरात -गावामध्ये अडकलेले असतील तर त्यांची मोफत प्रवासाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येणार आहेत .

तरी अशी मजूर लोकांची किंवा व्यक्तींची यादी तयार करून तहसील कार्यालय निवडणूक शाखेत किंवा व्यवस्थापक बस स्टँड उदगीर यांचेशी संपर्क करावा .

त्यानंतर संबंधित मजुरांना मोफत बस सेवेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सीमेवर  पोहोचवण्यात येईल .

 असे पर राज्यातील मजूर असतील तर मला  त्यांचे सध्याचे राहते ठिकाण, त्यांचे राज्य नाव व संख्या कळवावी तसेच उदगीर मधून महाराष्ट्र मधील दुसऱ्या जिल्ह्यात जाणारे   मजूर असतील तर मला  त्यांचे सध्याचे राहते ठिकाण, त्यांचा जिल्हा व संख्या कळवावी   अशी विनंती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केली आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा