वसमत येथील ३१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण
वसमत येथील ३१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण
एका एसआरपीएफ जवानाला सुट्टी ,रुग्ण संख्या स्थिर
हिंगोली - मुंबई वरून वसमत तालुक्यात परतलेल्या एका ३१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली तर औरंगाबाद येथील एका जवानाचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आल्याने सुट्टी देण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर स्थिर आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या १६५ रुग्णापैकी ९१ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने सुट्टी देण्यात आली. असून सद्य स्थितिला ७४ रुग्ण संख्या ही कॉन्स्टंट आहे.
सद्यस्थितीला जिल्ह्यात कळमनुरी ८,सेनगाव १२,हिंगोली २९,वसमत १५ ,याठिकाणी कोरोना केअर सेंटर येथे कोरोना लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कुठलेही गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते. तसेच औरंगाबाद येथील एक जवान बरा झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.
याशिवाय हिंगोली येथील
आयसोलेशन वॉर्डात १० रुग्ण ,औंढा येथे एक, भिरडाएक, सुरजखेडा एक,समुदाय आरोग्य अधिकारी दोन,पहेनी एक, माझोड एक,अश्या१४ कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर येथे भरती करण्यात आले असून,त्यांच्यावर वैद्यकीय पथकामार्फत उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २०९१ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १७७४ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.१६०१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजघडीला ४८३ रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर २८६ रुग्णांचे अहवाल अद्याप ही प्रलंबित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी सांगितले.