हिंगोली : मुंबईहून वसमत येथे परतलेल्या ८ जणांना कोरोनाची बाधा

मुंबईहून वसमत येथे परतलेल्या ८ जणांना कोरोनाची बाधा


 ग्रीन झोन इज कणव्हरटेट इनटू रेड झोन,रुग्ण संख्या गेली १५ वर ,


हिंगोली -  मुंबई-पुणे आदी कोरोना रोगाच्या हॉटस्पॉट भागातून मजूर आपल्या गावाकडे परत येत आहेत. अशाच एका घटनेत मुंबई येथून वसमत येथे आलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने आता एकूण रुग्ण संख्या १५ वर गेली आहे.त्यामुळे ग्रीन झोन असलेला जिल्हा आता रेड झोन मध्ये पुन्हा कणव्हर्ट होत असल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.


मुंबई वरून कामगार वसमत येथे परतल्याने त्या आठ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वसमत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  प्रशासनाने सदर रुग्णांना वसमत तालुक्यात येताच विलगी करण केल्यामुळे हे रुग्ण इतरांमध्ये मिसळले नाहीत आणि त्यामुळे मोठा धोका टळला आहे.


हिंगोली जिल्हा हा कोरोनामुक्त दिशेने वाटचाल करीत असताना पुन्हा आणखी वसमत येथे ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आणखी कॉन्ट्रोल करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंद प्रशासन करीत असल्याने आलेल्या सर्व रुग्णांना विलगीकरण करण्यात आले होते. त्यांचे वैद्यकीय अहवाल नुकतेच मिळाले असून मुंबईहून आलेले आठही जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.


हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९१ वर गेली होती. यातील८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली होती. आता सामान्य रुग्णालयात सात रुग्णावर उपचार सुरू असताना त्यात आणखी वसमत येथे आठ कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढल्याने आता ती१५ वर गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह आरोग्य यंत्रणा, महसूल विभाग जिल्ह्याला ग्रीन झोन मध्ये आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले  असताना पुन्हा त्यात आठ रुग्णाची भर पडली आहे.त्यामुळे आता जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोन इज कन्व्हरटेट इन टू रेड झोन कडे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा