हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवस दारू विक्रीची दुकाने सुरु राहणार

जिल्ह्यात दोन दिवस दारू विक्रीची दुकाने सुरु राहणार


कंटेन्मेंट झोन वगळता इतर दुकानांना परवानगी, तळीरामांची  सोय  होणार


 हिंगोली -  कंटेन्मेंट झोन वगळता जिल्ह्यात मद्य विक्री सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असून ,गुरुवार ,शनिवार असे दोन दिवस  ठरवून दिलेल्या वेळेत सूरू राहणार असून, तळी रामांची आता चांगलीच सोय झाली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड महिन्यापासून लॉकडाऊन ,संचारबंदी लागू असल्याने केवळ अत्यावश्यक दुकानांना चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी परवानगी दिली होती. मात्र मद्य विक्रीची दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच गैरसोय झाली होती. दारू विक्रीची दुकाने सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाने अटी व नियमांच्या आधारावर परवानगी देण्याचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोशल डिस्टन्स ,मद्य पिण्याचा परवाना असल्याशिवाय मद्य विक्री होणार नाही, रांगेत उभे राहता येणार नाही,या नियमांच्या आधारावर शहरी व ग्रामीण भागातील घाऊक विक्रेते यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. तसेच शहरी भागातील कन्टेन्ट मेन्ट झोन वगळता इतर क्षेत्रातील घाऊक मद्य विक्रेत्यांचे व्यवहार सुरु केले जाणार आहे. मात्र सायंकाळी पाच वाजेच्या नंतर दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.


दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मद्य विक्री दुकाने बंद ठेवली होती. रविवारी (ता.१७) मे पर्यंत लॉक डाऊन असल्याने केवळ गुरुवारी व शनिवारी या दोन दिवसात मद्य विक्री सुरू राहणार असल्याचे आदेश काढले आहेत. लॉक डाऊन कालावधी वाढविल्यास पुन्हा नवीन आदेश काढले जाणार आहेत. शिवाय परिस्थिती पाहून विचार केला जाणार आहे.त्यानंतर आता तब्बल दीड महिन्यानंतर मद्य विक्री दुकाने सुरु राहणार असल्याने तळीरामांची मात्र  सोय झाली आहे.


मद्य विक्री करताना दुकान दारांनी व ग्राहकांनी मास्क बंधनकारक असून सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. शिवाय दुकानातील नोकरदार यांना ताप, शिंका येत असतील तर दुकानात येऊ देऊ नये, सानिटायझर उपलब्ध करून ठेवावे,कामगारांची थर्मल स्क्यानिग करावी, सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच दुकानावर गर्दी व सोशल डिटन्सचे अंतर पाळण्यासाठी जवान व सहायक दुय्यम निरीक्षक यांची नेमणूक करण्याची जबाबदारी संबंधित विभागावर राहील.


असे असेल मद्य विक्रीचे वेळापत्रक
-----------------------------------------
सीएल देशी मद्य किरकोळ मद्य विक्री सकाळी ८ ते १ यावेळेत सुरु राहणार आहे. एफएल दोन सीएल एफएलटी ओडी तीन, देशी मद्यांची सीएल बंद विक्री ,एफएलबीआर बियर विक्री सकाळी १०ते १ यावेळेत तर वाईनची बंद बाटलीतून मद्यविक्री सकाळी १० ते  १, सीएल दोन देशी मद्यांची ठोक विक्री सकाळी १० ते ५ या वेळेत तर विदेशी मद्यांची विक्री सकाळी १०ते ५ यावेळेत सुरु राहणार आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा