हिंगोली -तब्बल ५५ दिवसानंतर जिल्ह्यात आजपासून लाल परीची चाके फिरणार 


 

तब्बल ५५ दिवसानंतर जिल्ह्यात आजपासून लाल परीची चाके फिरणार 

 

विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांची माहिती

 

हिंगोली -  कोरोना संसर्ग मुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन केल्यामुळे लाल परीची रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे  आगाराला एक कोटीचा फटका बसला असून आता शुक्रवार पासून तब्बल ५५ दिवसानंतर जिल्हानंतर्गत तालुका टू तालुका बसेस धावणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली.

 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन, संचारबंदी काळात बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेली दीड महिन्यापासून जिल्ह्यातील पाच ही आगारातील वाहतूक सेवा ठप्प झाल्याने आगाराला एक कोटीचा फटका बसला आहे. जिल्ह्यात केवळ १५ कोरोना बाधितरुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हानंतर्गत बस सेवा सुरू करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्यासाठी गुरुवारी परभणी आगाराचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी ,आगार प्रमुख चौतमल ,वाहतूक नियंत्रक दसपुते ,नगराळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेऊन पत्र सादर केले.

 

दरम्यान शुक्रवार( ता.२२) पासून जिल्हानंतर्गत बसेस धावणार असून तालुका टू तालुका स्तरावर तेही ५० टक्के प्रवासी महामंडळाच्या बस मधून प्रवास करू शकणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्री जोशी यांनी दिली. गेली  ५५ दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लाल परी जागेवरच उभी असल्याने चाके रुतली होती. आता२२ मे पासून शासनाने बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस सेवा हिंगोली -कळमनुरी, वसमत, औंढा, सेनगाव  तालुका स्तरावर धावणार आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यात बस जाण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. बसेस सूर करताना सानिटायझर ,मास्क आदीचा अवलंब करावा, प्रवाश्यांच्या हातावर सानिटायझर टाकूनच बस मध्ये प्रवेश द्यावा अश्या काही अटीवर जिल्हा प्रशासनाने बसेस सुरु करण्यासाठी मुभा दिली आहे. जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरु आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती नसल्याने प्रारंभी काही दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.मात्र गेली दीड महिन्यापासून जिल्हानंतर्गत अडकून पडलेल्या नागरिकांना गावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शासनाच्या महसुलात ही वाढ होणार आहे. त्यामुळे अर्थकारणाला गती देखील मिळणार आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा