लॉकडाऊनच्या काळात स्नेहलने रेखाटली आकर्षक विविध कलाकृती
लॉकडाऊनच्या काळात स्नेहलने रेखाटली आकर्षक विविध कलाकृती
हिंगोली - गेली दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन संचारबंदी आहे. त्यामुळे घरात बसून काय करावे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र पोदार इंटरनॅशनल स्कुल मधील इयत्ता सातवीतील स्नेहल गिरीधारी बोथिकर या विद्यार्थिनींनी लॉकडाऊनचा फायदा घेत एकापेक्षा एक शेकडो विविध चित्रे रेखाटत आनंद घेत आहे.
शहरातील गंगानगर येथे राहत असलेली स्नेहल बोथिकर हिला अगोदर पासून चित्र काढण्याचा आगळा वेगळा छंद आहे. तिचे वडील गिरीधारी बोथिकर हे जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कामकाज पाहत आहेत. स्नेहल ही सध्या पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे सातवीत आहे. तीला चित्रकलेची लहान पनापासून आवड असल्याने तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन देत तिच्या कलेला स्वप्नात उतरविले आणि पाहता पाहता स्नेहलने एकापेक्षा एक विविध कलाकृती रेखाटत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात गेली दीड महिन्यापासून लॉकडाऊन, संचारबंदी लागू असल्याने शाळा, महाविद्यालय बंद ठेवले आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना लॉक डाऊन काळात काय करावे असा प्रश्न पडला होता. लहान मुले टीव्हीवरील बबलू डब्ल्यू कार्टून , कॅरम बोर्ड, तर काहींना चित्रे काढण्याचा छंद असल्याने आपल्या कलेला हाच वेळ मिळत असल्याचे पाहून स्नेहलने मुक्त हस्त चित्र, पुतळे,पारंपरिक कला, निसर्गरम्य अशी विविध चित्र रेखाटत असून तिने आतापर्यंत शेकडो चित्रे काढली असल्याचे स्नेहलने सांगितले. तसेच ती म्हणाली की, एरव्ही शाळा सुरु असल्याने अभ्यासाचा ताण असतो, शिवाय क्लासेस यामुळे चित्रे काढण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. आता आयती संधी लॉकडाऊन मुळे चालत आल्याने मी माझ्या कलेचा पुरेपूर फायदा घेत आहे. त्यामुळे माझा वेळ कसा जातो हेच मला कळत नसल्याचे तिने सांगितले.
लॉकडाऊनचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग घ्यावा
-----------------------------
कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन ,संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलत घरातच बसून आपल्यात असलेल्या कलेला वाव दयावा, तसेच शाळा जरी बंद असल्या तरी आपला अभ्यास करीत वेळेचा सदुपयोग घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.
स्नेहल बोथीकर
पोदार स्कुल, हिंगोली