दिलासादायक ;-- हिंगोलीत १७ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त

दिलासादायक ; हिंगोलीत १७ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त


जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल


हिंगोली - मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तवरून परतलेल्या  ८८ कोरोना बाधित रुग्णापैकी सोमवारी (ता.११) जवान व इतर इतर पाच व रविवारी दोन जवान असे एकूण १७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता ७७ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे  कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वजाबाकी होत असल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.


जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी ग कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच डोखेदुखी वाढली होती. कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करते की काय अशी भीती आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला लागली होती .मात्र जिल्हाधिकारी रुचेश
 जयवंशी यांनी वेळीच तातडीने आरोग्य यंत्रणेच्या बैठका घेत त्यांचा चांगला समाचार घेत रुग्णाकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे बेरजेचे वजाबाकीत होण्यास सुरुवात झाली.


जिल्ह्यात आतापर्यंत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील पहिला कोरोनाधित आढळलेल्या रुग्णाचे १४ व १५ दिवसांनंतरचा थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्याने त्यास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, त्यानंतर तब्बल ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यासर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात एसआरपीएफच्या ८४ जवानांचा समावेश आहे. शुक्रवारी यातील दोन जवानांचे १४ व १५ दिवसांनंतर घेतलेले थ्रोट स्वॅब अहवाल सायंकाळी निगेटिव्ह आले. त्यामुळे दोन जवान कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या एसआरपीएफचे ८८ जवानांसह सेनगाव येथील दोन, वसमत येथील एक, जालना एसआपीएफ जवानाच्या संपर्कातील दोन व जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा समावेश आहे. दरम्यान, एसआरपीएफ जवानांपैकी सहा जवानांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.


सोमवारी( ता.११) प्राप्त अहवालानुसार एसआरपीएफचे अकरा जवान व यापूर्वीचे दोन जवान व अन्य पाच असे एकूण मिळून १७ रुग्णांचे  अहवाल  निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आता जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण ७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. सोमवारी ११ जवान व अन्य सहा रुग्ण कोरोनावर मात केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक मंचक इप्पर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे यांच्यासह परिचारिका आदींची उपस्थिती होती. 


१३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या संपर्कातील १३ जनांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड या शनिवारी हिंगोली येथे आले असता त्यांनी विविध क्वारंटाइन सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तसेच सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात भरती केलेल्या कोरोना बाधित जवनासी संवाद साधला असता जवानांनी कैफियत पालकमंत्र्या समोर मांडली यात जेवण निकृष्ट, व्यवस्था केली जात नसल्याच्या तक्रारी केल्यामुळे पालकमंत्री गायकवाड यांनी आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले होते. त्यानंतर दोनच दिवसात अंडी, फळे असा चांगला आहार दिल्यामुळे अकरा व इतर सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज ते कोरोनामुक्त झाले आहेत. सामान्य रुग्णालयाचा ढिसाळ कारभाराला पालकमंत्री गायकवाड यांनी ब्रेक लावल्याचे बोलले जात आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा