रिसाला बाजार परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण !
रिसाला बाजार परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण !
जिल्हाधिकारी जयवंशी यांची करडी नजर
हिंगोली - रिसाला परिसरातील एका २४ वर्षीय सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या परीचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाल्यानंतर
हा परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला. पोलिसांनी हा संपूर्ण भाग सील केला असून पालिकेने संपूर्ण भाग निर्जंतुकी करण केला आहे. या परिसराकडे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार याचे विशेष लक्ष आहे. स्वतः जिल्हाधिकारी जयवंशी यांनी या परिसराची पाहणी करून तीन किलो मीटरचा परिसर सील करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे ९१ रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची डोखेदुखी वाढली आहे. मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेल्या १९४ जवाना पैकी ८४ जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे.याच बरोबर सामान्य रुग्णालयातील कोरोना बाधितावर उपचार करणाऱ्या एका परीचारिकेला देखील लागण झाल्याने त्या परीचारिकेवर आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले असून उपचार सुरू केले आहेत. ही परिचारिका कोणा कोणाला संपर्क केली यांची खातर जमा आरोग्य यंत्रणेकडून केली जात असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेत आहेत. बुधवारी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ,आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी गणेशवाडी, रिसाला परिसरात घरोघरी जाऊन कोरोना बाधित असलेल्या परीचारिकेच्या शेजारील व परिसरातील भागांची तपासणी करीत आहेत. त्यानंतर परीचारिकेच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना देखील १४ दिवस क्वारंटाइन केले जाणार आहे. जिल्हा प्रशासन याकडे लक्ष ठेऊन आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता आपआपल्या घरातच राहावे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन ,पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, कोरोना वर मात करण्यासाठी आपल्या घरात राहून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.