लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना


हिंगोली -  लॉकडाऊन मुळे बाहेर जिल्ह्यातील किंवा पर प्रांतातील अडकलेल्या नागरिकांना परत आपल्या गावी जाण्यासाठी शासनाने वाहतुकीची व्यवस्था केली असून त्यासाठी संपर्क करण्यासाठी आगार निहाय नियंत्रण कक्षाची स्थापना केली असल्याची माहिती आगार प्रमुख श्री चौतमल यांनी दिली.


कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात २३ मार्च पासून सर्वत्र लॉकडाऊन ,संचारबंदी लागू करण्यात आल्याने प्रत्येक जिल्ह्यात कामगार, कर्मचारी, विद्यार्थी बाहेर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अडकले आहेत.शासनाने बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अटी व शर्तीवर  बसेसची व्यवस्था उपलब्ध दिली जाणार आहे.त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी परभणी विभागामार्फत वाहतूक नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये परभणी, जिंतूर, हिंगोली, गंगाखेड, पाथरी, वसमत, कळमनुरी, विभागीय कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


असे आहेत आगार क्रमांक
-------------------
अडकलेल्या नागरिकांसाठी सोमवार पासून खालील क्रमांकावर संपर्क साधून मोफत एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे.त्यासाठी आगर व त्यांचे दूरध्वनी क्रमांक
परभणी - ८०८७२०००४०
जिंतूर   - ८४८५०३४३७२
हिंगोली -८४११०१२५३८
पाथरी -८७९३४४२९९६
कळमनुरी- ७७७४९७६७५१
विभागीय कार्यालय -९६०४३२५१९५


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा