हिंगोलीत आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर







हिंगोलीत आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर


रुग्ण संख्या पोहचली १८ वर

 

हिंगोली - मुंबई वरून जिल्ह्यात परतलेल्या सहा कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून आणखी त्यात सहा रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना बंधितांची संख्या १८ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

 

मागील चार दिवसापूर्वी मुंबई वरून गावी  परतलेल्या ४५ वर्षीय एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला औंढा येथील कोविड केअर सेंटर येथे भरती करून उपचार सुरु केले आहेत. तर इतर पाच रुग्ण वसमत येथील कोविड केअर सेंटर येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे पाच जण मुंबई येथून कनेन्ट मेन्ट झोन मधून आल्यानेच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा दावा वैद्यकीय अधिकारी यानी अहवाल अंती सांगितले. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून,त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत.

 

जिल्ह्यात आतापर्यन्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांने शतक गाठले होते. परंतु जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल,जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पोलीस दल आदी विभागाने तातडीने पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केल्यामुळेच यातील८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता केवळ १८रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर कोविड सेंटर येथे उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. तसेच २७३ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचा ग्राफ दिसून येत आहे.


 

 



 



 















ReplyReply to allForward







Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा