हिंगोली - औरंगाबाद येथे भरती असलेले पाच जवान कोरोनामुक्त
हिंगोली - औरंगाबाद येथे भरती असलेले पाच जवान कोरोनामुक्त
पॉझिटिव्ह रुग्णांची निगेटिव्ह
कडे वाटचाल , जिल्हा प्रशासनाला यश
हिंगोली - कोरोनाची लागण झालेल्या सात जवानांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे भरती करण्यात आले होते. त्यापैकी गुरुवारी पाच जवानांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता केवळ दहा रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा आरोग्य यंत्रणेच्या चुकी मुळे शंभराच्यावर गेला होता. मुंबई मालेगाव येथून परतलेल्या कोरोना संक्रमित जवानांना एकाच कक्षात ठेवल्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर रुग्णालयाची यंत्रणा हलली.आणि प्रशासन जागे झाले. एकूण कोरोना रुग्ण संख्या १०० वर पोहचली होती. यापैकी ९० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने आजघडीला केवळ दहा रुग्ण संख्या कमी झाल्याने ग्राफ देखील घसरत चालला आहे.
औरंगाबाद येथे सहा रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी पाच रुग्ण बरे झाल्याने आता यातील एका एसआरपीएफ जवानावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती देखील स्थिर असल्याचे सांगण्यात येते.जिल्हा सामान्य रुग्णालयात भिरडा येथील एका२३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीला कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
आतापार्यंत एकूण १७८१ व्यक्तींना आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर येथे भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १४२३ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १४४६ व्यक्तींना डिस्चार्ज दिला आहे. आजघडीला ३३४ व्यक्ती भरती आहेत .तर २६९ रुग्णांचे अहवाल येणे अद्यापही बाकी आहेत.