मतिमंद मुलीवर अत्याचार आरोपीविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल
मतिमंद मुलीवर अत्याचार आरोपीविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल
सेनगाव - सेनगाव येथील एका ३५ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याने ती गर्भधारणा करणाऱ्या विरुद्ध सेनगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा गुरुवारी (ता.२८) दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव येथील ३५ वर्षीय मतिमंद मुलगी आपल्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये राहात असल्याने आरोपी रमेश अर्जुनराव लांडे राहणार सेनगाव यांनी मतिमंद व एकत्री पणाचा फायदा घेत या मुलीवर सतत अत्याचार करून गर्भधारणा होण्यास कारणीभूत ठरल्याने व केलेला गैरप्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारू अशी धमकी देणाऱ्या संबंधिता विरुद्ध फिर्यादी कांताबाई कुंडलिक गाढवे वय ५० वर्षे रा. धनगर गल्ली सेनगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश लांडे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १९५ , कलम ३७६(२) ( जे) ( एल) ( एन) ४४८, ५०६
भादवि प्रमाणे सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दाखल अधिकारी पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव हे सदर घटनेचा तपास करीत आहेत.