प्रवाश्यांना इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन करून तपासणी करावी 

प्रवाश्यांना इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन करून तपासणी करावी 


जिल्हा शल्यचिकित्सकाचे वैद्यकीय अधिकाऱ्याना आदेश


हिंगोली - मुंबई सारख्या कनेन्टमेन्ट झोन मधून कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे त्यांची इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन कक्षात ठेवून तपासणी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी वैद्यकीय अधिकारी यांना रविवारी पत्रा द्वारे दिले आहेत.


मुंबई येथून वसमत मध्ये दाखल झालेल्या आठ मजुरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्याची कोरोना पॉझिटिव्ह संख्या १५ वर गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा
 शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी ,प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना खरमरीत पत्र पाठवले आहे.यात ते म्हणाले की, मुंबई येथून येणाऱ्या प्रवाश्याना कोरोनाची लागण असण्याची श्यक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याबतीत व्यक्तिशः लक्ष देऊन काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई सारख्या ठिकाणावरून येणाऱ्या सर्व प्रवाश्याना इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन करून त्यांचे थ्रोट स्वाब नमुने घेण्यात यावेत ,पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा